
सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने तळवडे अर्बन को. ऑप. क्रे. सो. लि. ने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत आज २० ऑगस्ट २०२५ रोजी एक भव्य स्मरणिका प्रकाशन आणि सत्कार सोहळा आयोजित केला आहे.
तळवडे येथील श्री सिद्धेश्वर कॉम्प्लेक्समध्ये सायंकाळी ५:३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावणार असून विशेष अतिथी म्हणून सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणरा आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या जिल्हा प्रबंधक दिपाली माळी, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद मधुकर गावडे आणि जिल्हा उपनिबंधक बाळ परब आदींची उपस्थित असणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षपद सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष प्रकाश दळवी भूषविणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील योगदानाबद्दल मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, तळवडे विकास सोसायटीचे चेअरमन बाबुराव दत्ताराम परब, आणि अन्य सहकार क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे.
संस्थेचे संस्थापक तथा प्रेरणास्थान अतुल सुधाकर काळसेकर आणि विद्याधर रवींद्रनाथ परब यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत असुन या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.