
सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्यतर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. ही स्पर्धा कॉड व इनलाईन या प्रकारांमध्ये घेण्यात आली होती. 16 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरोस येथे ही स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये 17 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कु. अभिनव तुकाराम गावडे यांनी प्रथम स्थान पटकावले तर कु.जोश अँटनी जॉनीनिरो नादार याने तृतीय स्थान पटकावले.
17 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये कु. वेदा घनश्याम गावडे हिने प्रथम स्थान मिळवले. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात कु. अंश रामदास जाधव यांनी द्वितीय स्थान पटकावले आहे. तर 14 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये कु. झोया जावेद शेख हिने प्रथम स्थान मिळवले. कु. विधी सुनील मिशाळ हिने देखील प्रथम स्थान मिळवले आहे.
11 वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये कुमार ओम सुनील मिशाळ याने प्रथम स्थान तर कु. कैवल्य अवधूत गावडे याने द्वितीय स्थान मिळवले. 11 वर्षाखालील मुलींच्या गटांमध्ये कु. सृष्टी जनार्दन राणे हिने द्वितीय स्थान मिळवलेले आहे. सदर विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक हितेश मालंडकर व श्रीम. शेरॉन अल्फान्सो यांनी मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा व प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.