मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या विभव राऊळची जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: August 12, 2025 19:39 PM
views 180  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२५ अंतर्गत सावंतवाडी तालुकास्तरीय स्पर्धा मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाली. 'क्वांटम युगाची सुरुवात: संभाव्यता व आव्हाने' या विषयास अनुसरून झालेल्या या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील माध्यमिक शाळांमधून एकूण २० स्पर्धक सहभागी झाले.या स्पर्धेत दिलेल्या विषयावर मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीचा विद्यार्थी कु . विभव विरेश राऊळ याने आपले अभ्यासपूर्ण विचार पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या मदतीने प्रभावीपणे मांडले. कु विभव राऊळ याच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे त्याची निवड जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी झाली आहे.त्यास विज्ञान शिक्षक श्रीम. फरजाना मुल्ला व श्री.मिहीर राणे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

त्याच्या या यशाबद्दल  सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक श्री ॲडव्होकेट श्री.  शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत ,डॉक्टर श्री.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.