
सावंतवाडी : शहरात नगरपरिषद प्रशासनावर कोणाचा अंकुश न राहिल्याने विविध समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. मोती तलाव येथील मुख्य रस्त्यावर झाड तोडल्यानंतर राहिलेला कचरा अद्याप काही उचललेला नाही. त्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे.
मोती तलाव येथील वळणावरच हे झाड असून पावसामुळे या पानांवरून गाड्या घसरत आहे. मात्र, न.प. प्रशासनाच त्याकडे दुर्लक्ष झाल आहे. तसेच एसपीके कॉलेज गेटच्या बाजूला कचऱ्याचे ढीग तयार झालेत. हा कचरा उचलला न गेल्यानं विदृपीकरण होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.