
सावंतवाडी : सालईवाडा येथील दीनानाथ शिरसाट यांच्या भुसारी दुकानाला काल रात्री आग लागली. वेळीच अग्निशमन बंब दाखल होऊन आगीवर नियंत्रण आल्याने मोठा अनर्थ टळला.
ही घटना सालईवाडा परिसरात घडली. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझवण्यात यश आले. दुकानात असलेल्या फ्रीजने पेट घेतल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. यात दुकानातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने वेळीच आग आटोक्यात आणण्यास यश मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा, दुकानाला लागून असलेली दुकाने , घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अनर्थ घडला असता.