
सावंतवाडी : महावितरणच्या गलथानपणामुळे जाणारे बळी, समस्या थांबण्याच नाव घेत नाही आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विघ्नहर्त्या देवाला महाआरती करत साकडं घालण्यात आले.
मळेवाड येथे महावितरणच्या विभागाच्या विरोधात उबाठा शिवसेनेकडून भक्तीभावाने महाआरती करण्यात आली. मळेवाड नाका येथे गणेश मंदिरामध्ये झालेल्या या महाआरतीवेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार तालुकाप्रमुख मायकल डिसूजा, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, आबा केरकर , गुरुनाथ नाईक , नीलेश शिरसाट , बाळा रेडकर , रवि तळवनेकर , मुन्ना मुळीक , नंदू नाईक, प्रकाश राऊत, वासुदेव राऊळ , सचिन गावडे , नम्रता झारापकर , स्मिताली नाईक , शिल्पा नाईक , सुभद्रा नाईक , प्रशांत नाईक , बाळा आरोंदेकर , संतोष पेडणेकर , अनिल विर्नोडकर , संजय रेडकर , गोकुळदास मोठे , रामदास पेडणेकर , सारंग कोरगांवकर , विनोद काजरेकर, प्रशांत बुगडे, तुषार पालव , नितिन कांबळी , बबन राउत, रवींद्र काजरेकर, रवी सावंत, अनिल जाधव, विलास परब आधी मोठ्या संख्येने पदाधिकारी ग्रामस्थ रिक्षाव्यवसायिक व मळेवाड चौकातील व्यापारी वर्ग उपस्थित होते. विजेच्या समस्यांबाबत राज्याच्या देवाभाऊच दुर्लक्ष होत असल्याने अखेर देवाचा धावा करत सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन शिवसैनिकांकडून करण्यात आले.