
सावंतवाडी : शहरातील ऐतिहासिक मोती तलाव येथे नगरपरिषदेने गणपती विसर्जन, धार्मिक कार्यक्रमावेळी निर्माल्य टाकण्यासाठी ठेवलेल्या कलशात निर्माल्याऐवजी अंड्याची कवच आणि ओला कचरा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
धार्मिक कार्यक्रम, गणपती विसर्जन येथे होते. नागरिकांच्या सोयीसाठी आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी नगरपरिषदेने तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवले आहेत. मात्र, काही समाजकंटकांनी या सुविधेचा गैरवापर करत त्यात पवित्र निर्माल्याऐवजी घरातील कचरा टाकला. या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्या असून नियमांची पायमल्ली झाली आहे. नगरपरिषदेन तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. अशा प्रकारचा विकृतपणा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.