आरोसमध्ये वृद्धेची आत्महत्या

Edited by: विनायक गांवस
Published on: August 09, 2025 20:15 PM
views 302  views

सावंतवाडी : तालुक्यातील आरोस नाबरवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेने घराशेजारील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.जयश्री तुकाराम रेडकर असं या महिलेचं नाव आहे. जयश्री रेडकर या गेल्या अनेक वर्षांपासून हृदयविकाराने त्रस्त होत्या. शिवाय, त्यांचं मानसिक संतुलनही ठीक नव्हतं. याच कारणांमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.