
सावंतवाडी : सिं.जि.शि.प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या प्रि प्रायमरी विभागाचे रक्षाबंधन शनिवारी ०९ ऑगस्ट २०२५ रोजी थाटात साजरे करण्यात आले. नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजीच्या चिमुकल्यांनी सुंदर पारंपारीक वेशभुषेत औक्षण करून, राख्या बांधून व मिठाई वाटून भाऊ बहीणीच्या नात्याची विण घट्ट करणारा हा सण उत्साहाने साजरा केला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीम. सेलिन बर्नाड, श्रीम. निकिता आराबेकर व श्रीम. सिद्रा शेख यांनी विशेष मेहनत घेतली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे सि. जि. शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब सौ. शुभदादेवी सावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखम सावंत भोंसले, युवराज्ञी श्रध्दाराजे सावंत भोंसले व मंडळाचे सदस्य, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर. तसेच प्रशालेचे, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.