
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची एक महत्त्वाची आणि तातडीची बैठक उद्या, रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी कुडाळ येथील एमआयडीसी विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे.
येत्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लाक्षणिक उपोषणाबाबत सूक्ष्म नियोजन करण्यासाठी ही बैठक घेण्यात येत आहे. यासोबतच, बैठकीत इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीतील प्रमुख विषय खालीलप्रमाणे असून मागील सभेचे इतिवृत्त वाचून ते मंजूर करणे. १५ ऑगस्ट रोजीच्या लाक्षणिक उपोषणाचे नियोजन करणे. जिल्हा कार्यकारिणीमध्ये काही आवश्यक बदल करणे.संघटनात्मक निधी संकलन करणे.जमाखर्च वाचून त्याला मंजुरी देणे. सर्व ८ तालुका कार्यकारिणींच्या कामाचा आढावा घेणे. अध्यक्षांच्या परवानगीने इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे. या बैठकीला सर्व संबंधित सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे.पीडित सरपंच आणि पीडित वीज ग्राहकांनी सुद्धा स्वतःच्या तक्रार अर्जासहित बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.