
सावंतवाडी : शिवसेनेच्यावतीने कोलगाव गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा व अंगणवाडी मधील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या संकल्पनेतून या शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी सर्व शाळा व अंगणवाडी यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यात आल्या. या शाळा व अंगणवाडी यांना सोयी व सुविधा उपलब्ध करण्याबाबत आमदार दीपक केसरकर व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांचे लक्ष वेधुन सोयी व सुविधा उपलब्ध करण्याबाबत प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
गावातील सर्व शाळा व अंगणवाडी यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केल्याबद्दल मुख्याध्यापक शिक्षक व अंगणवाडी सेविका यानी आभार मानते. यावेळी शिवसेनेचे माजी कोलगाव विभाग अध्यक्ष सुशांत ठाकूर, कोलगाव विभागीय महिला अध्यक्षा अँड सौ शितल अभिजीत टिळवे, युवा सेनेचे कोलगाव विभाग प्रमुख मुकेश ठाकूर, कोलगाव बुथ प्रमुख आदेश गावडे, रविकिरण राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ सुद्धा ठाकर उपस्थित होत्या.