
सावंतवाडी : बाहेरचावाडा येथील जंगलात गांजा बाळगताना आढळून आल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ ६२ ग्रॅम वजनाचा गांजा सापडला आहे.
याप्रकरणी त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वडार, रा. कोलगाव असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव असून सावंतवाडी बाहेरचावाडा येथे तो गांजा विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने सापळा रचत बाहेरचावाडा येथील जंगलात पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळ ६२ ग्रॅम वजनाचा गांजा सापडून आला आहे. त्याची किंमत सरकारी दरानुसार सहाशे रुपये एवढी आहे. त्यांच्यासोबत काही अन्य युवक देखील होते अशी माहिती असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.