
सावंतवाडी : गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा कारने सावंतवाडी शहरात तीन ते चार दुचाकींना धडक दिली. काल रात्री हा प्रकार घडला. या भरधाव कारला नागरिकांनी शिवाजी चौक येथे अडवले.
या कारचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. नागरिकांकडून कार आडवण्यात आल्यानंतर पोलिसांनी या कारसह चालक व त्याच्यासोबत असणाऱ्यांना ताब्यात घेतले. पुढील कारवाई पोलीस करत आहेत. गोव्याहून कोल्हापूर आजारा येथे जाणारी ही इनोव्हा काल रात्रीच्या सुमारास सावंतवाडीत मुख्य बाजारपेठेत आली. या कारने तीन ते चार दुचाकी ना जोरदार धडक दिली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. नागरिकांनी कारचा पाठलाग करत कार थांबवली. याचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.