
सावंतवाडी : नववर्षाच्या पुर्वसंध्येला सावंतवाडीकरांच्या आनंदात भर घालणाऱ्या आनंदोत्सव "प्रदर्शन व विक्री" २०२४ च शानदार उद्घाटन सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्याहस्ते संपन्न झाले. उद्घाटनानंतर या आनंदोत्सवाला शहरवासीयांनी तुफान गर्दी केली होती.
हा आनंदोत्सव २८ आणि २९ डिसेंबर पर्यंत आर.पी.डी हायस्कुल येथे दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत भरणार आहे.संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्याहस्ते आनंदोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, आनंदोत्सवाच्या संयोजिका पौर्णिमा सावंत आदी उपस्थित होते.या प्रदर्शनात दागिन्यांचे अद्वितीय कलेक्शन, हस्तकलेच्या वस्तू, एथनिक साड्या, गृहसजावट, ड्रेस मटेरियल, लहान मुलांचे कपडे, बॅग्स, डिझायनर साड्या, डिझायनर कपडे, ज्वेलरी, इंटेरिअर प्रॉडक्ट्स, मसाले, पॉटरी, पेंटीग्स, रेडीमेड ड्रेस, लाईव्ह पोट्रेट, कॅरिकेचर, टॅटु व मेहेंदी स्टॉल्स, मालवणी खाद्यपदार्थ स्टॉल आहेत. शहरवासीयांनी या उत्सवात सहभागी होत आनंद लुटला. या उद्घाटन सोहळ्याचे सुत्रसंचालन अँड प्रणिता कोटकर यांनी केलं.