
सावंतवाडी: शहरातील सालईवाडा येथील रहिवासी श्रीमती पुष्पलता शिवराम भिसे (८२) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. क्रीडा तपस्वी कै. शिवराम उर्फ शिवाजी भिसे यांच्या त्या पत्नी तर छायाचित्रकार अनिल भिसे आणि नगरपालिका अभियंता संतोष उर्फ भाऊ भिसे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने भिसे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.