
सावंतवाडी : योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जगभरात योगा दिवस साजरा केला जातो. रोगराई, विकार, आजरपणाला दूर करण्यासाठी योग करत शरीर तंदुरुस्त ठेवण्यात यावे यासाठी योग करावा असे आवाहन भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, युवराज लखमराजे भोंसले यांनी केले. सावंतवाडी राजवाडा येथे भाजप युवा नेते संदीप गावडे यांच्या पुढाकारातून योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
सावंतवाडी राजवाडा येथे भाजप योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचिन व सनातन भारताची योग ही अनमोल ठेव असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतुन संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये मंजूर झालेल्या ठरवा प्रमाणे संपूर्ण जगभर योगदिवस साजरा केला जातो असे मत संदिप गावडे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी शालेय तसेच विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी या शिबिरामध्ये मोठी उपस्थिती दर्शविली.
यावेळी युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, युवा नेते संदिप गावडे, जिल्हा बँक संचालक रवि माडगावकर,मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मंडल अध्यक्ष संतोष राऊळ, मिसबा शेख, दिलीप भालेकर, सागर ढोकरे, आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी योग मार्गदर्शक म्हणून प्रदीप्ती कोटकर तसेच रिया सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.