सावंतवाडी अर्बन को-ऑप. बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Edited by: विनायक गावस
Published on: October 03, 2023 19:10 PM
views 61  views

सावंतवाडी : बँकेची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर २०२३ रोजी बँकेच्या प्रधान कार्यालयात पार पडली. सुरुवातीस दिवंगत झालेल्या बँकेच्या सभासदांना श्रध्दांजली अर्पण करुन बँक अध्यक्ष अॅड. सुभाष गोपाळ पणदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुरुवात करण्यात आली. सुरुवातीस अध्यक्ष पणदुरकर म्हणाले की, गेली तीन वर्षे बँक सातत्याने प्रॉफिट मध्ये असुन यावर्षी रु.१०.८८ नफा झालेला आहे. बँकेची सरकारी व मान्यता प्राप्त रोख्यामध्ये गुंतवणुक रु.१९६५.३२ लाख असुन वसुल भागभांडवल रु.८.२० कोटी आहे. गेली दहा वर्षे फक्त एन.पी.ए. शुन्य टक्के राखलेले आहे. तसेच बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक घोटाळा, अपहार झालेला नाही. तसेच संचालक मंडळाने कोणत्याही प्रकारचा भत्ता व कर्जे घेतलेली नाही. वरीलप्रमाणे आर्थिकस्थिती असुनही केवळ भांडवल पर्याप्तत प्रमाण ४.२५ टक्के असल्यामुळे आर.बी.आय ने बँकेवर सहा महिन्याकरीता निबंध घातलेले आहे. हे निर्बंध उठविण्याकरीता बँकेस रु. ३.५ कोटी शेअर्स कॅपिटलची आवश्यकता आहे. पैकी रु.५० लाख मंत्री दीपक केसरकर यांच्या सभासदांकडुन गोळा केलेले आहे. प्रत्येक सभासदांनी जास्ती जास्त शेअर्स घेऊन रु. ३.५० कोटी चे शेअर्स उद्दीष्टपुर्ण करण्यास सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्षांनी केले.

नोटीसीचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुप्रिया राणे यांनी केले. सभेत बँकेच्या आर्थिक पत्रकावर चर्चा करुन मंजुरी देण्यांत आली. वैद्यानिक लेखापरिक्षकाची नेमणुक आर.बी.आय.ने केली त्यांस मान्यता देण्यांत आली. अंतर्गत लेखापरिक्षक म्हणून नाईक गावणेकर आणि कंपनी पणजी गोवा यांची नेमणुक करण्यात आली. बँकेचे अधिकृत भागभांडवल रु.१५ कोटीवरुन रु.२५ कोटी करण्यास पोटनियम दुरुस्तीस मंजुरी देण्यांत आली.

कणकवली येथील बँकेचे सभासद विघ्नेश गोखले यांनी बँकेस नवीन भागभांडवल गोळा करण्याकामी सर्वतोपरी सहकार्य आपण करण्यास तयार असुन लवकरात लवकर बँकेचे व्यवहार सुरु करा अशी सुचना केली. राजु बेग, राजन रेडकर यांनी सभेच्या कामकाजात भाग घेऊन सुचना केल्या. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष  रमेश बोंद्रे, संचालक रमेश पई, गोविंद वाडकर अशोक दळवी,  उमाकांत वारंग, नरेंद्र देशपांडे, सौ.मृणालिनी कशाळीकर, सौ. अर्पणा कोठावळे आदी संचालक उपस्थित होते. आभार बँकेचे ज्येष्ठ संचालक गोविंद वाळा वाडकर यांनी मानले.