
सावंतवाडी : जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संकल्पनेतून “सेवा पंधरवडा” अंतर्गत शाळा तिथे दाखले या अभियान अंतर्गत पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांना वय, अधिवास दाखले शाळेमध्येच देण्याचे नियोजन केले होते. यात १०० टक्के पूर्तता करत १० हजार ११२ वय, अधिवास दाखवल्यांचे वाटप करत सावंतवाडी महसूल विभाग जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मांडलेल्या या संकल्पनेत आम्ही चांगली कामगिरी करू शकलो. अशक्य प्राय वाटणारी गोष्ट सर्वांच्या सहकार्याने पूर्ण झाली. जातीचे दाखले देण्याच काम सुरू असुन ते लवकरात लवकर संपविण्याचे उद्दीष्ट आहे. १० हजार ११२ इतके वय अधिवास दाखले आम्ही वितरित केलेत.या अभियानासाठी सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी आणि सर्वात महत्वाचे सर्व csc आणि महा इ सेवा केंद्र चालक आणि सर्व शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले त्यामुळे हे शक्य झाल्याचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, जात प्रमाणपत्रांचे १ हजार ३८६ दाखले वाटप करण्यात आले आहेत. या कामात श्रीमती तारी, श्रीमती गावडे, श्री. निपाणीकर, श्रीमती चव्हाण, श्रीमती पवार, स्वप्नील प्रभू, पंकज किनळेकर, महेश लटपटे, केतन कांबळे, दीपिका राठोड आणि कोमल काकडे यांचे विशेष सहकार्य लाभले. सर्व csc सेंटर आणि महा इ सेवा केंद्र चालक या सर्वांनी रात्री उशिरा, सुट्टीच्या दिवशी देखील काम केले त्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले आहे.










