सावंतवाडी तहसील कार्यालयाकडून आवश्यक दाखले देण्यास सुरुवात...!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 29, 2023 19:30 PM
views 82  views

सावंतवाडी : नवीन वर्षाच्या शैक्षणिक प्रवेशासाठी सावंतवाडी तहसील कार्यालयाकडून तातडीने आवश्यक ते सर्व दाखले मुलांना देण्यास सुरुवात केली आहे. सावंतवाडी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व शिष्टमंडळाने तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले आहे. 

विद्यार्थ्यांच्या नवीन वर्षाचे प्रवेश सुरू झाल्याने शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या दाखल्यान संदर्भात तहसील कार्यालयाकडून विलंब होत होता. त्यामुळे प्रवेशासाठी मुलांना ताटकळत राहावे लागत होते. ही बाब मनसेच्या निदर्शनास मुलांनी आणून देताच मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी तातडीने याची दखल घेत. याप्रशनी तहसीलदार श्रीधर पाटील यांची भेट घेतली होती. अकरावि अथवा तत्सम प्रवेशासाठी मुलांना लागणारे दाखले तातडीने उपलब्ध करून दिले जावेत अशी मागणी केली होती.

शासकीय कामांन संदर्भात प्रशासनाने त्वरित सहकार्य करावे जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना कोणतेही अडथळे येणार नाहीत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे सांगत तहसीलदार पाटील यांचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुभेदार यांनी केलेल्या मागणीची तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दखल घेत मुलांना लागणारे दाखले विनाविलंब देण्यास सुरुवात केली आहे.याप्रश्ननी मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांनी पुन्हा तहसीलदार पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी ही माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनीही दाखल्यासंदर्भात कोणताही अडथळा येत नसल्याचे श्री सुभेदार यांना सांगितले व पाटील यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल सुभेदार यांनी त्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना शासकीय कामा संधर्भात लागणारे सर्व दाखले तात्काळ देऊ असे आश्वासन पुन्हा एकदा सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी मनसेला दिले आहे.