
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अकरा जागांसाठी अकरा जणांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याने पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत संस्थेच्या सभासदांमधून निवडलेले म्हणजेच सर्वसाधारण गटांतून आठ महिलांची निवड बिनविरोध झाली आहे.
सर्वसाधारण गटातून १. सौ. कीर्ती किशोर बोंद्रे, - २. सौ. सपना देवेंद्र तुळसकर, ३. सौ. देवता हेमंत मुंज, ४. सौ. वैभवी बाळकृष्ण नेवगी, ५. सौ. सपना संदीप विरनोडकर, ६. सौ. क्षिप्रा प्रमोद सावंत, ७. सौ. छाया नरेंद्र देशपांडे, ८. सौ. सानिका चंद्रकांत शिरोडकर. अनुसुचित जाती-जमातीमधून - सौ. माधुरी गोविंद वाडकर, इतर मागास प्रवर्ग - सौ. श्वेता प्रशांत शिरोडकर, भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग (राखीव) - सौ. रेखा सुर्यकांत भुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. आर. आरोवंदेकर यांनी काम पाहिले.