सरपंच सेवा संघाच्या सावंतवाडी तालुका समन्वयकपदी विनायक सावंत

अहमदनगर येथे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली नियुक्ती
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 12, 2022 14:47 PM
views 175  views

सावंतवाडी  : सरपंचांच्या न्याय्य हक्कासाठी कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या सावंतवाडी तालुका समन्वयक पदी ओवळीये गावचे सरपंच विनायक सावंत यांची निवड करण्यात आली आहे. विनायक सावंत हे गेली अनेक वर्षे राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून तालुकास्तरीय सर्व सरपंचांना संघटित करणे, मार्गदर्शन करणे  आदी कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सरपंच विनायक सावंत यांचे सावंतवाडी तालुक्यातील विविध क्षेत्रातील भरीव योगदान पाहून अहमदनगर येथे पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

      सरपंच सेवा संघ या सरपंचांच्या न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या संघटनेच्या सावंतवाडी तालुका समन्वयक पदी विनायक सावंत यांची निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.