सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी मनसेही करणार आंदोलन !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 16, 2024 14:30 PM
views 301  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बरेच वर्ष रखडलेले आहे ते लवकरात लवकर पुर्ण होण्यासाठी रेल्वे स्थानकात सिंधुदुर्गातील जनता आणि रेल्वे प्रवासी संघटना प्रजासत्ताक दिना दिवशी सकाळी ९ वाजल्या पासुन आंदोलन करणार आहे. त्या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे सुधीर राऊळ यांनी केल आहे. तर

कोकणातील जनतेच्या प्रश्नांची जाण नसलेले मतदाना दिवशी लोकांना गृहीत धरून चालणारे हे आजी-माजी सत्ताधारी लोकांची दिशाभूल करतात. अशा या राजकारणाला आता जनता बळी पडणार नाही. लवकरात लवकर टर्मिनसच काम चालू करून सर्व गाड्यांना थांबा द्यावा आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा सिंधुदुर्गातील जनता व प्रवाशी संघटनेबरोबर मनसेही तीव्र आंदोलन छेडणार असल्याचं सुधीर राऊळ यांनी सांगितले.