सावंतवाडी पं. स. त माती विषयी जनजागृती | ६३ ग्रा. प., ८५ गावातील २ मूठ मातीपासून तयार केला अमृत कलश

Edited by: विनायक गावस
Published on: August 25, 2023 19:18 PM
views 78  views

सावंतावडी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत "मेरी मिट्टी मेरा देश' अभियानांतर्गत व मिट्टी का नमन, मिट्टी को वंदन उपक्रमांतर्गत पंचायत समिती स्तरावर "अमृत कलश" कार्यक्रम आज रोजी पंचायत समिती सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरापर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी यासाठी हे अभियान ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर राबविण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुक्यातील 63 ग्रामपंचायती व 85 गावांतील 2 मूठ माती सन्मानपूर्वक गोळा करुन पंचायत समिती स्तरावर एकत्र करुन अमृत कलश तयार करण्यात आला. 63 ग्रामपंचायतीमधून सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा उपस्थितीत हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सावंतवाडीच्या कर्मचारी, अधिकारी यांनी देशभक्तीपर गीतांचे गायन केले. तसेच रांगोळी घालणे इ. उपक्रम करण्यात आले. यावेळी  प्रशासक तथा गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्व ग्रामपंचायतींनी मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान उत्स्फूर्तपणे राबविल्याबद्दल सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य व ग्रामसेवक यांचे कौतुक केले व अशा प्रकारचे राष्ट्रीय उपक्रम राबवून आपले देशाविषयी प्रेम व देशभक्तीची उज्ज्वल परंपरा अशीच चालू ठेवावी असे आवाहन केले. याप्रसंगी श्रीम. प्रांजल जाधव, सरपंच शेर्ले तसेच  हेमंत मराठे यांनी मनोगत व्यक्त करुन वेळोवेळी अशाप्रकारचे राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करुन आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मता व एकसंघता कायम ठेवू असा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत चव्हाण, कृषि अधिकारी यांनी केले.

या कार्यक्रमानंतर पंचायत समिती कर्मचारी निवासस्थाने भटवाडी परिसर सावंतवाडी येथे वसुधावंदन व अमृतवाटिका या उपक्रमांतर्गत 75 देशी वृक्षांची लागवड केलेल्या क्षेत्रास भेट देऊन जिओ टॅगिंग करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वासुदेव नाईक, प्रशासक तथा गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी, तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, सुदेशराणे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, कल्पना बोडके, गटशिक्षणाधिकारी, सिंधु पवार, बालविकास प्रकल्प अधिकारी, वसंत मोहिते, उप अभियंता, जलसंधारण विभाग,विनायक पिंगुळकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी,संदीप नेमळेकर, माजी उपसभापती, शितल राऊळ, माजी उपसभापती,कृषि अधिकारी / विस्तार अधिकारी (सर्व), कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष् ठ सहाय्यक, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप" वंदेमातरम" ने करण्यात आला.