सावंतवाडी पं. स. इमारतीसाठी १४ कोटी ५० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता : मंत्री केसरकर

Edited by:
Published on: October 10, 2023 20:05 PM
views 243  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी शासनाने १४ कोटी ५० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली असल्याची माहिती स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सहकार्य केले असल्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले. 

सावंतवाडी तालुका पंचायत समितीच्या इमारतीसाठी दोन कोटी रुपये मंजूर होते. मात्र तो प्रस्ताव रद्द करून सुसज्ज चांगली अशी नवीन इमारत व्हावी म्हणून शहरातील शिरोडा नाका परिसरात सध्या असणाऱ्या पंचायत समितीच्या २७ गुंठे जागेमध्ये १४ कोटी ५० लाख रुपयांच्या नवीन प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. दरम्यान सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला या तालुक्यातील नवीन पंचायत समितीच्या इमारती उभ्या राहत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या स्वतःच मालकीच्या जमीन व इमारती बनल्या असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. लवकरच सावंतवाडी तालुका पंचायत समितीचा या कामाला सुरुवात होईल अशी ग्वाही दीपक केसरकर यांनी दिली.