रामजल्लोषात सावंतवाडीनं जपला एकोपा..!

एकात्मततेची परंपरा आजही कायम !
Edited by: विनायक गावस
Published on: January 23, 2024 09:30 AM
views 237  views

सावंतवाडी : संस्कृती, परंपरा जपत असताना जात, धर्म, पंथ या पलिकडे जाऊन मानवतेचा धर्म सांभळण्यात सावंतवाडी शहर नेहमीच अग्रेसर राहील आहे. संस्थान काळापासून ही परंपरा जपली जात आहे. काल सोमवारी तब्बल पाचशे वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले. राम मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने सर्वत्रच मंगलमय वातावरण होतं. ठिकठिकाणी मंदिरात आनंदोत्सव धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी सावंतवाडी शहरातील एकात्मता आजही जपली जात असल्याचं पहायला मिळालं.

बाजारपेठ येथील श्री साई वात्सल्य धाम पंचम देवस्थान या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राम मुर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त परिसरात सजावट करण्यात आली होती. सायंकाळी भजन, महाआरती या ठिकाणी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना लाडू वाटून तोंड गोड करण्यात आलं. तर फटाक्यांची आतिषबाजी करत श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा जल्लोष करण्यात आला. या सोहळ्यास हिंदूंसह मुस्लिम, ख्रिस्ती बांधव देखील उपस्थित होते. सावंतवाडीत होणारे गणेशोत्सव, दिवाळी, मोहरम, ईद, ख्रिसमस आदी उत्सव एकात्मतेच्या भावनेतून साजरे केले जातात. प्रत्येकाच्या धर्माच आदर राखणार शहर म्हणून या शहराकडे पहिलं जात. सर्व सण, उत्सव इथं एकोप्यानं साजरे केले जातात‌. सोमवारी देखील प्रभू रामचंद्रांच्या मंगलमय सोहळ्यात त्याचा प्रत्यय आला. सालईवाडा बाजारपेठील या मंगलमय सोहळ्यात देव्या सुर्याजी, संतोष गांवस, परिक्षीत मांजरेकर, शैलेश गवंडळकर, जावेद शेख, जोसेफ आल्मेडा, राघवेंद्र चितारी, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, अर्चित पोकळे, प्रथमेश प्रभू, देवेश पडते, वैभव दळवी, सुरज मठकर, संदीप निवळे, दानिश शेख, पांडुरंग वर्दम, दयानंद रेडकर, गौतम सावंत, अवधूत गावडे, सुनील नेवगी, राजेश दळवी, गौतम सावंत, शुभम बिद्रे, पंकज बिद्रे, मनोज वारंग, शंभू विर्नोडकर आदिंसह शहरातील नागरिक सहभागी झाले होते. सावंतवाडी शहराचा हा एकोपा इतरांना आदर्शवत असाच आहे.