सावंतवाडीत 'कवयित्री संमेलन'

Edited by:
Published on: January 08, 2024 20:17 PM
views 103  views

सावंतवाडी : आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी  व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांचे विभागीय 'कवयित्री संमेलन' 28 जाने‌वारीला सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती आरतीचे संपादक प्रभाकर भागवत, वाचन मंदिर कार्यवाह रमेश बोंद्रे, कोमसाप तालुका अध्यक्ष अँड. संतोष सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे. 

कविवर्य आरती प्रभू यांच्या स्मरणार्थ 1982 पासून प्रकाशित होणारे 'आरती मासिक' गेली 40 वर्ष चिंतामणी साहित्य सहकारी प्रकाशन संस्था सावंतवाडी नियमितपणे प्रकाशित करत आहे. साहित्य चळवळ जोमाने वाढीच्या दृष्टीने मासिकातर्फे कवी संमेलन कथा,कविता, नाट्य, कार्यशाळा, काव्य, लेखन स्पर्धा, चर्चासत्राचे विविध उपक्रम घेतले जात आहेत. गेली वीस वर्षहून अधिक काळ सातत्याने आरती मासिक कोमसाप व वाचन मंदिर यांच्या सहकार्याने आरतीच्या सहसंपादिका कवियत्री उषा परब या गेली सतरा वर्ष कवयित्री संमेलन घेत आहेत. या संमेलनासाठी महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक जवळच्या राज्यातील विविध भागातील नामवंत कवियत्री यांना आमंत्रित केले जाते.

त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवियत्रीनाही व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष स्थान महाराष्ट्रातील आघाडीच्या कवयित्री अखिल भारतीय संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर अरुणा ढेरे, निरजा, प्रज्ञा पवार, शैला सायनाकर, सुनंदा भोसेकर, अनुपमा उजगेकर, आसावरी काकडे आदी कवियत्रींनी अध्यक्ष पद भूषवले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने आरती मासिक दरवर्षी सिंधुदुर्ग-गोवा मर्यादित नवोदित महिलांसाठी काव्य लेखन स्पर्धा घेऊन नव्या लिहित्या हातांचा शोध घेत असते. चांगल्या कवितेला संमेलनात व आरती मासिकांमध्ये  काव्यलेखन स्पर्धा घेऊन नव्या लिहित्या हातांचा शोध घेतला जात आहे. तरी या निमंत्रित कवियत्री संमेलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिका कवियत्री उषा परब यांनी केले आहे.