सावंतवाडी नं. 4 च्या शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी संतोष तळवणेकर

Edited by: विनायक गावस
Published on: September 11, 2023 15:21 PM
views 54  views

सावंतवाडी : शहरातील आयएसओ मानांकित शाळा सावंतवाडी नंबर चार च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी संतोष तळवणेकर यांची पुनश्च निवड झालेली असून त्यांच्या निवडीबद्दल समस्त पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 

संतोष तळवनेकर हे 2011 पासून ते आज पर्यंत शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात शाळेला उत्तुंग यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा आहे.शाळा विकासाची अनेक कामे त्यांनी आपल्या कार्यकाळात शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य ने केली आहेत.शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग, सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने केली आहेत.