
सावंतवाडी : ३ डिसेंबर तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या सावंतवाडी नं. ४ शाळेत 'जागतिक दिव्यांग दिना'निमित्त जनजागृती फेरी काढण्यात आली. गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, शिक्षण विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दिव्यांग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात केंद्रातील केद्रप्रमुख स्नेहा लंगवे, शाळेतील शिक्षक, समग्र शिक्षा अभियान गट साधन सावंतवाडी केंद्रातील विशेषतज्ज्ञ गोपाळ गावडे, मंगेश चव्हाण, विशेष शिक्षक शिवशंकर तेली, वकील राऊळ, विजय पाटील, शिवानंद होडगे विषयतज्ज्ञ प्रसाद सांगेलकर, श्री. कुडव, श्री. पिंगुळकर आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाळ गावडे यांनी केले तर सुत्रसंचलन पाटील यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना जागतिक दिनाने महत्त्व विशद करून दिव्यांगाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी दिव्यांग व्यक्तींना समान संधी व समान हक्क दिले जावे, याविषयी माहिती दिली गेली. शाळेपासून ते सावंतवाडी शहरामधून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थी, पालक, सर्व मान्यवर उपस्थित होते. आभार विशेषतज्ज्ञ मंगेश चव्हाण यांनी मानले.
यावेळी दिव्यांग व्यक्तींना समान संधी व समान हक्क दिले जावे याविषयी माहिती दिली. शाळेपासून ते सावंतवाडी शहरामधून जागतिक दिव्यांग दिन निमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी सर्व मान्यवर सर्व विद्यार्थी, पालक, सर्व मान्यवर उपस्थित होते.तर सर्वाचे आभार विशेषतज्ञ चव्हाण यांनी मानले.