
सावंतवाडी : शिवसेनेच्या माध्यमातून माजी मंत्री आमदार दीपक केसरकर नगराध्यक्षपदासह २० नगरसेवक पदासाठी आपल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शक्तीप्रदर्शन करत ते आपल नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत.
शिवसेनेकडून ॲड. निता सावंत-कविटकर नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून २० जण नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करणार आहेत. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांसह नेत्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.










