नगरपरिषदेने 'त्या' कंपनीवर गुन्हा दाखल करावा !

सुरेश भोगटेंची मागणी !
Edited by: विनायक गांवस
Published on: July 06, 2024 08:00 AM
views 165  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहरामध्ये नेटवर्क केबल अंडरग्राउंड घालण्याचं काम चालू असून सावंतवाडी नगरपालिकेला विश्वासात न घेता जे केबलचं काम चालू आहे ते शहरवासीयांना त्रासाचं आहे. सावंतवाडी शहरवासीयांसाठी असलेली पाण्याची लाईन ही पूर्वीपासून अंडरग्राउंड असून रोडच्या खालून आहे. सध्या जे ड्रिलिंग करून केबल टाकण्याचं काम चालू आहे त्याबाबत नगरपरिषदेला कोणतीही कल्पना नाही. सार्वजनिक बांधकाम कडून परवानगी घेऊन ड्रिलिंग करून पाईप टाकण्याचे काम चालू आहे. ते तात्काळ थांबवण्यात यावे, सावंतवाडी शहरांमध्ये ड्रिलिंग करत असताना यांच्याकडून अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटत आहे‌. पाण्याच्या पासून लोकांना चार-चार दिवस वंचित राहावं लागत आहे‌. गेले चार दिवस दत्तनगर परिसरामध्ये शेकडो घरांना पाणी मिळालं नसून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे अशी माहीती माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी दिली.


तर गेले चार दिवस नागरिकांच्या घरामध्ये पाण्याचा थेंबही गेलेला नाही. अनेक लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या असून आम्ही सावंतवाडी नगरपरिषदेचे वाटर सप्लाई अभियंता व इतर कर्मचाऱ्यांची माहिती घेतली असता लाईन फुटलेली असून ड्रिलिंग केल्यामुळे लाईन कुठे फुटली याचा पत्ता लागत नाही अशी माहिती नगर परिषदे कडून मिळालेले आहे. नगरपरिषदेने या ड्रिलिंग करत असलेल्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा व त्यांच्याकडून योग्य ती कारवाई करून पाईपलाईन फुटल्याची पूर्ण भरपाई करून घेण्यात यावी तसेच लोकांचे पाणी लवकरात लवकर नेहमीप्रमाणे चालू करण्याच्या साठी प्रयत्न करावेत अशी मागणी सुरेश भोगटे यांनी केली आहे‌