ठेकेदाराच बोगस काम !

पाऊस पडल्यावर उघडले प्रशासनाचे डोळे !
Edited by: विनायक गांवस
Published on: May 12, 2023 17:50 PM
views 336  views

सावंतवाडी : शहरातील नगरपरिषदच्या अंतर्गत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर पॅच मारून खड्डे बुजवण्याच काम हाती घेण्यात आले आहे. मे महिन्याच्या १२ तारीखपासून हे काम हाती घेतले आहे. मात्र, यात ठेकेदाराच बोगस काम दिसून येत आहे. काही ठिकाणचे खड्डे सोडून उर्वरित भागात पॅच मारण्याच अर्धवट काम केल जात आहे. पावसाला झालेली सुरुवात व रस्त्यावर मारलेले हे पॅच यामुळे अपघाताला आमंत्रण दिले जाणार आहे. वर्ष दोन वर्षांच्या आतच रस्त्यांची होणारी दुर्दक्षा पाहता ठेकेदाराकडून वापरलं जाणारं मटेरियल व क्वालिटी कामावर शंका निर्माण होत आहे. जनसामान्यांच्या निधीचा यामुळे अपव्यय होत आहे. 


मार्च, एप्रिल महिन्यात व मे महिन्याच्या आत ही काम होण आवश्यक होत. परंतु, पावासाला सुरूवात झाल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडलेले पहायला मिळत आहे. मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची दुर्दक्षा तशीस असून त्याकडे नगरपरिषद बांधकाम विभाग कधी पोहचाणार ? हा देखील एक सवाल आहे. तर पॅच भरण्याच काम ठेकेदार महेश पाटील यांच्याकडून केलं जातं असल्याची माहिती नगरपरिषद अधिकाऱ्यांकडून देण्यात आली असून ते राहिलेले खड्डे बुजवायची सुचना संबंधित ठेकेदाराला करणार असल्याच त्यांनी स्पष्ट केले आहे. 


एकंदरीतच, न.प.वर प्रशासकाच राज्य असल्यानं अधिकारी व ठेकेदार जनतेच्या पैशाचा अपव्यय करत असल्याचं दिसून येत आहे. जबाबदारीच भान नसल्यानं पावसाला सुरुवात झाल्यानंतर काम हाती घेण्यात आले असून 'पॅच' भरून जनतेचा पैशांत मलिदा लाटण्यासाठीचा हा प्रोग्राम ठरत आहे. याबाबत नागरिकांकडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.