
सावंतवाडी : राज्यातील १०८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करुन सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाजसुधारकांची नावे देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. त्यानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्गला ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार कै. जयानंद मठकर यांचे नाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या आयटीआयचे नाव जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग असे होणार असून ज्येष्ठ समाजवादी नेते, सावंतवाडीचे माजी आमदार कै. जयानंद मठकर यांचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या निर्णयाच स्वागत होत असून सावंतवाडीतून सरकारचे आभार मानले जात आहेत.