
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय येथे भुलतज्ञ डॉक्टर शमा देशपांडे या व्यक्तिगत अडचणीमुळे व कामाच्या ताणामुळे जानेवारी महिन्यामध्ये राजीनामा देणार आहेत. यासाठी त्यांनी पूर्व नोटीस जिल्हा रुग्णालय येथे पाठवली आहे. यामुळे आता नव्याने भुलतज्ञ डॉक्टर तेजस्विनी विजय आवळे यांची आठवड्यातून तीन दिवसासाठी नियुक्ती डॉक्टर दिलीप माने उपसंचालक कोल्हापूर यांच्या सूचनेनुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी नियुक्ती केली आहे. जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी ही माहिती दिली असून त्यांनी याबाबतची मागणी केली होती .