सावंतवाडीत डॉ. नवांगुळ यांच्या 'आई टेस्ट ट्यूब बेबी' सेंटरचं थाटात उदघाट्न

आई - बाबा होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मुलाने महत्वपूर्ण काम केल्याचा अत्यानंद | डॉ. नवांगुळ यांच्या मातोश्रींचे भावनिक उद्गगार
Edited by: संदीप देसाई
Published on: October 13, 2024 10:07 AM
views 401  views

दोडामार्ग : आई - बाबा होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं महत्वपूर्ण काम माझ्या मुलाच्या हातून होतंय यांचा मला अत्यानंद होत आहे. 'आई टेस्ट ट्यूब बेबी' केंद्राच्या माध्यमातून अनेकांना मातृत्व देणाऱ्या हक्काच्या केंद्रांचे माझ्या हस्ते उद्घाटन झालं, आता या केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाचे आई-बाबा होण्याचे स्वप्न साकार व्हावे, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते, असे प्रतिपादन सौ. सुनिला नवांगुळ यांनी केले. सावंतवाडीत डॉ. नवांगुळ यांच्या यंशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज 'आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर'चे उद्घाटन विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर डॉ. नवांगूळ यांच्या मातोश्री सौ. सुनिला सुधाकर नवांगुळ यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोवा येथील डॉ. केदार पडते, डॉ. सुधाकर नवांगुळ, डॉ. राजेश नवांगुळ, सौ. मनिषा नवांगुळ, यश नवांगुळ, डॉ. गायत्री शर्मा,  (पालयेकर),  यांसह सौ. मीना राजू मदने, सौ. बिना किरण जोशी, अॅड. नकुल पार्से कर, डॉ. कश्यप देशपांडे, डॉ. मिलिंद खानोलकर, डॉ. रेवण खटावकर, डॉ. विनायक लेले, डॉ. अनिश स्वार, डॉ. विद्यानंद सावंत, सौ. देशपांडे, सौ. उषा परब, अॅड. प्रकाश परब, डॉ. संजना देसकर, सौ. तृप्ती पार्सेकर, डॉ. अमेय स्वार, डॉ. सुरज देसकर, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. पावसकर यांच्यासह वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, यावेळी डॉ. राजेश

नवांगुळ यांच्या आई सौ. सुनिला नवांगुळ व वडील डॉ. सुधाकर नवांगुळ, डॉ. केदार पडते यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ झाल्यावर टेस्ट ट्यूब बेबी केंद्राची माहिती डॉ. राजेश नवांगुळ यांनी दिली. उपस्थित मान्यवर यांचेही स्वागत डॉ. राजेश नवांगुळ व सौ. मनिषा नवांगुळ यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आई टेस्ट ट्यूब बेबी केंद्र आणि डॉ. राजेश नवांगुळ यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक ऍड . नकुळ पार्सेकर यांनी केलं.