
सावंतवाडी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्गचे ५९ वे कोकण प्रांत अधिवेशन पूर्व कार्यकर्ता बैठक सावंतवाडी येथे पार पडली. २७, २८ व २९ डिसेंबरला भोसले नॉलेज सिटीमध्ये हे अधिवेशन होणार असून कोकण प्रांतातील विद्यार्थी परिषदेचे एक हजार सदस्य उपस्थित राहणार आहेत.
सावंतवाडी राजवाडा येथे ५९ व्या कोकण प्रांत अधिवेशन पूर्व कार्यकर्ता बैठक संपन्न झाली. यावेळी अधिवेशनाचे सचिव अतुल काळसेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आदर्श विद्यार्थ्यांची फौज आमच्याकडे आहे. अशा विद्यार्थ्यांची आज राष्ट्राला गरज आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने विद्यार्थी परिषदेच नव रूप समोर येईल असे प्रतिपादन श्री. काळसेकर यांनी केले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सिंधुदुर्गचे कोकण प्रांत अध्यक्ष श्रीकांत दुगीकर, साईनाथ सितावार, शिवाजी भावसार, अधिवेशन स्वागताध्यक्ष सचिव अतुल काळसेकर, युवराज लखमराजे भोंसले, शैलैंद्र दळवी, डॉ. प्रसाद देवधर, विजय केनवडेकर, बंड्या सावंत, स्नेहा धोटे, चिन्मयी खानोलकर, अवधूत देवधर आदी उपस्थित होते.