
सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सावंतवाडी मतदारसंघ गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. त्यात आता जनतेचे रक्षण करणारे अधिकारी देखील लाच घेताना पकडले जातं आहेत. केसरकर यांचा अधिकारी प्रशासनावर वचक नसल्यामुळेच या गोष्टी घडतं आहेत त्यामुळे शिक्षणमंत्री म्हणून मुलांसमोर ते काय आदर्श ठेवणार अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
मनसे नेते उपरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा मतदारसंघ दिवसेदिवस गुन्हेगारी व अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे. गुन्हेगारीचें प्रमाण तर सर्वांत जास्त याच मतदारसंघात आहे. त्यात ही ते गृहमंत्री असताना त्यांच्याचं घरापासूनच्यां हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळेत गांजा सापडला होता. आंबोली भागात सुरु असलेल्या गुन्हेगारीने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. आंबोली घाटात आत्तापर्यत परराज्यातून परजिल्ह्यातून खून करून मृतदेह आणून टाकण्याचे प्रमाण सुरूच आहे. एकंदरीतचं केसरकर यांचा मतदारसंघ आता विकासात जरी नंबर वन बनला नाही तरी गुन्हेगारीत प्रथम क्रमांकावर नक्कीच आला आहे. आता तर जनतेचे रक्षण करणारे पोलिस प्रशासन देखील लाचलुचपतंच्यां जाळ्यात सापडले आहे. केसरकर यांच्याच सावंतवाडी शहरातील पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या अधिकारी दर्जाच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना गुरुवारी लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले त्यामुळे संपूर्ण पोलीस खाते हडबडले आहे. शिक्षण मंत्री केसरकर यांचा मतदारसंघ म्हणजे गुन्हेगारी, खून, अंमली पदार्थ, अवैध दारू वाहतूक यामुळे चर्चेत असताना आता प्रशासकीय अधिकारी दिवसाढवळ्या बिनधास्त लाच घेताना पकडले जात आहेत. राज्यात नको त्यां राजकारणाकडे लक्ष दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यांच्या मतदारसंघात ही स्थिती असेल तर शिक्षण मंत्री म्हणून ते विद्यार्थ्यांसमोर काय आदर्श ठेवणार असा सवाल मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी कारवाई करण्याचे सोडून पोलिस अधिकारीच जर लाच घेत असतील तर शासन वं मंत्री म्हणून तुमचा काय फायदा. आता तर केसरकर यांच्या स्वतःच्या शहरात अंमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट पोलिसांनी पकडले. तर राजरोसपणे जुगार अड्डे देखील सुरु आहेत.
त्यांच्या मतदारसंघात पोलीस अधिकारी लाच घेताना सापडल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वं पोलीस यांचे एकमेकांशी आर्थिक लागेबंधे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वच अवैध धंद्यांना आळा घालण्यास या भागाचे आमदार मंत्री म्हणून केसरकर असमर्थ ठरले आहेत.
गृहराज्यमंत्री ते विद्यमान शिक्षण मंत्री असेपर्यंत त्यांच्या मतदारसंघात सातत्याने गुन्हयांनी परिसिमा गाठली आहे. तरुण पिढी विद्यार्थी अमली पदार्थांच्या आहारी जात आहे. शिक्षण मंत्री म्हणून नको त्या गोष्टीत लक्ष घालण्या पलीकडे आणि विकासाच्या पोकळ घोषणा करण्यापलीकडे त्यांनी या मतदारसंघांसाठी काहीच केले नाही त्यामुळेचं हा मतदारसंघ गुन्हेगारीत सर्वात पुढे असून युवा पिढी मटका, जुगार, अंमली पदार्थ दारूधंदयामध्ये गुंतून बरबाद झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सामाजिक सुधारणांच्या अनुषंगाने केसरकर यांनी कोणतेही प्रयत्न केलेला नाही. तर उलट लोकांची फसवणूक घोषणाच्यां माध्यमातून करीत आहेत. प्रशासनावर त्यांचा कोणताही अंकुश नाही. अधिकारी वर्ग त्यांना घाबरत नाही. शासकीय कार्यालयामध्ये सर्वसामान्य जनतेला आपल्या कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे येथील जनतेने त्यांना योग्य धडा शिकवण्याची गरज असल्याचेही उपरकर यांनी म्हटले आहे.