सावंतवाडी १३ ऑक्टोबरला रंगभरण स्पर्धा

Edited by: विनायक गांवस
Published on: October 11, 2024 14:13 PM
views 420  views

सावंतवाडी : येथील पी.एफ. डॉन्टस फाऊंडेशन, सैनिक स्कूल, आंबोली, सावंतवाडी नगरपरिषद, सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यान येथे इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. येत्या रविवारी 13 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी नगर परिषदेच्या जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान येथे ठीक 03.30 वाजता ही स्पर्धा सुरू होईल. ठीक 03.00 वाजता रजिस्ट्रेशन चालू होईल. इयत्ता 01 ली ते 4 थी व इयत्ता 05 वी ते 08 वी अशा दोन गटांसाठीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आहे.

माजी सैनिकांचे नेते सहकाररत्न कै. पी.एफ. डाॅन्टस यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना आकर्षक आकर्षक रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. चित्र रंगवण्यासाठी कागद आयोजकांकडून पुरवला जाईल. रंग कामासाठी आवश्यक रंग साहित्य विद्यार्थ्यांनी स्वतः आणावे. विविध जलरंग, रंगीत पेन्सिल,वॅक्स, क्रेऑन, पोस्टर कलर, ऑइल पेस्टल, स्केच पेन यासारख्या रंग माध्यमाचा वापर करू शकतात. स्पर्धकांनी वयाचा पुरावा म्हणून शाळेचे ओळखपत्र/आधार कार्ड किंवा कोणताही अन्य पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन  आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - 9420195518, 9403369299