सावंतवाडी बोरिवली ST बसला अपघात...!

Edited by:
Published on: September 30, 2023 13:03 PM
views 7570  views

सावंतावडी :  एसटी परिवहन महामंडळाच्या सावंतवाडी बोरिवली ST बसला अपघात झाला. शुक्रवारी संध्याकाळी ५. ३० वाजता सावंतवाडी आगारातून एकच चालकाची नेमणूक करून पाठवण्यात आली. यावेळी सोबत वाहक हा चालक पदावर अनुभवी असा द्यावा अशी पूर्व कल्पना  सावंतवाडी आगार व्यवस्थापकांना संबंधित चालकाने देऊन सुद्धा आगार व्यवस्थापनाने मनमानी पद्धतीने एकाच चालकाची ड्युटी नोंदवली.

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास एसटी बसच्या चालकाने सतत साडेबारा तास गाडी चालवून अखेर त्याला झोप लागली व तेव्हड्यात गाडीवरील नियंत्रण सुटून पेण जवळील खारपडा टोलनाक्यावर ST बस आदळली .टोलनाका बंद असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, प्रवाशांचे हाल झाले असे अनुचित प्रकार घडू शकतात याबाबतची पूर्वसूचना मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी परिवहन महामंडळाच्या प्रशासनास दिली होती. परंतु याची पूर्ण दाखल न घेता फक्त चालकासोबत वाहकाची नेमणूक केली गेली. एकच चालकाची सतची आठ तासांपेक्षा म्हणजे साडेबारा तास सतत ड्युटी नोंदवली गेल्यामुळे हा अपघात घडला असे अमित वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे.