
सावंतवाडी : रक्तपिशवी दरवाढ कमी करण्यात यावी याबाबत शासनाच लक्ष वेधून देखील त्याची दखल घेतली जात नाही आहे. तसेच रक्तासारख्या महत्वाचा विषयाबद्दल शासन संवेदनशील नसल्यान शनिवार दि.१८ मार्च २०२३ रोजी वेळ सकाळी १० वाजता रक्तपिशवी दरवाढीचा विरोधात राज्य शासनाला व संबंधित प्रशासनाला जाग आणण्यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढीमध्ये 'रक्ताचे आंदोलन' करणार असल्याची माहीत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिली. याबाबत प्रशासनाला पत्र देत त्यांनी आंदोलन छेडल आहे. या रक्ताच्या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीला महाराष्ट्र सरकार व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा युवा रक्तदाता संघटनेच्यावतीनं देण्यात आला आहे.