भव्य रॅलीने सावंतवाडी भगवामय ; मंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती

Edited by: विनायक गांवस
Published on: February 19, 2026 20:00 PM
views 39  views

सावंतवाडी : विश्व हिंदू परिषद व बजरंग दल सावंतवाडीच्या माध्यमातून शिवजन्मोत्सव सोहळ्याच आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्ताने कोकण कॉलनी ते गांधी चौक अशी भव्य रॅली काढण्यात आली. पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थिती निघालेल्या या रॅलीने भगवामय वातावरण परिसरात निर्माण झाल होतं. 

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर भव्य रॅलीला‌ प्रारंभ करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांसह कोकण कॉलनीतून ही रॅली निघाली. गांधी चौक येथे या रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर गांधी चौक येथे सभेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक नितीन महाजन, युवराज लखमराजे भोंसले, प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, बजरंग दलाचे कृष्णा धुळपनवर, सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, निलम नाईक, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर, दिनेश गावडे, स्वागत नाटेकर आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.