
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ४८ ठरावांना यावेळी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी सुचना मागण्यांसह मंजूरी दिली. मात्र, सभा संपताच सत्ताधारी नगरसेवकांत 'तू-तू - मैं-मैं' झाल्याची जोरदार चर्चा नगरपरिषदेत सुरू आहे.
आज पालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला माजी नगराध्यक्ष तथा विरोधी नगरसेवक संजू परब यांनी ऑनलाईन वरून आक्रमक पवित्रा घेत आक्षेप घेतला. मात्र, त्यांनंतर सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी ही सभा उत्तमपणे हाताळत नगरसेवकांच्या सुचना मागण्या ऐकून घेतल्या. मात्र, ही बैठक संपताच सत्ताधारी नगरसेवकांत तू-तू - मैं-मैं झाल्याची जोरदार चर्चा सध्या नगरपरिषदेत सुरू आहे. नगरसेवकांत आपापसातच हा भडका उडाल्याची माहिती मिळत आहे. अखेर उपस्थितांनी या वादावर पडदा टाकल्याचे समजत असून नेमकं वादाच कारण समजू शकलेले नाही. मात्र, सभागृहा बाहेरील या तू-तू-मैं-मैं ची जोरदार चर्चा सुरू आहे.










