
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिनकर धारणकर स्मृती "क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६" चे उद्घाटन भाजपा युवानेते विशाल परब यांच्याहस्ते करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने बालनाट्य, एकांकिकेसह संगीत नाट्याची मेजवानी रसिकांना अनुभवता येत आहे.
यावेळी श्री. परब म्हणाले, क्षितीज नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून सावंतवाडीच्या नावलौकिकात आणखीन भर पडणार आहे. सावंतवाडीला नाट्य कलेचा मोठा वारसा आहे. नाट्य चळवळ पुढे घेऊन जात असताना आज या महोत्सवाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ देण्याच काम होत आहे असं मत विशाल परब यांनी व्यक्त केल. बॅ नाथ पै सभागृहात या नाट्य महोत्सवास प्रारंभ झाला. याप्रसंगी क्षितिज इव्हेंटचे अध्यक्ष बाळ पुराणिक, हर्षवर्धन धारणकर, सीए लक्ष्मण नाईक, कोमसाप सचिव ॲड. संतोष सावंत, नगरसेवक तथा रोटरी क्लब अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नगरसेविका निलम नाईक, सुनिता पेडणेकर, सुरेश पुराणिक, सत्यजित धारणकर, गुरुप्रसाद चिटणीस, पत्रकार विनायक गांवस, भाजपा सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, भाजपा शहर चिटणीस धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक हर्षवर्धन धारणकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरवी घाटे हीन तर आभार बाळ पुराणिक यांनी मानले. दरम्यान, आज सायंकाळी संगीत 'होनाजी बाळा' तर उद्या वि.वा. शिरवाडकर लिखित 'वीज म्हणाली धरतीला' हे नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहेत.










