चाकरमान्यांना होळीला गावी यायला आता रोरोचा पर्याय

१ मार्चला विजयदुर्गसाठी पहिली बोट
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 21, 2026 12:18 PM
views 139  views

मुंबई : शिगमोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांना रेल्वे, बस अथवा खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागते, मात्र या शिमग्याला रोरो बोट सेवेने चाकरमानी  समुद्रमार्गे कोकणात येवू शकतात. मुंबई ते विजयदुर्ग ही बहुप्रतिक्षित बोटसेवा अखेर १ मार्चपासून सुरू होत आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी एम २ एम कंपनीच्या बोटीचे पहिले तिकीट बुक करून या सेवेचा शुभारंभ केला. कोकण किनारपट्टीवर जलवाहतूक सुरू व्हावी यासाठी मंत्री राणे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते, ज्याला आता यश आले आहे.

१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मुंबई बंदरातून पहिली बोट विजयदुर्गसाठी रवाना होईल आणि दुपारी ३ वाजता तिथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात, २ मार्च रोजी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून सुटणारी बोट सायंकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होईल. मार्च महिन्यात या मार्गावर बोटीच्या एकूण १६ फेऱ्या नियोजित आहेत. मुंबई ते विजयदुर्ग या मार्गावर ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च रोजी बोटी धावतील, तर विजयदुर्ग ते मुंबई या मार्गावर ५, ८, १२, १५, १९, २२ आणि २६ मार्च रोजी बोट उपलब्ध असेल. प्रस्तावित तिकिट दर असे असतील, इकॉनॉमी : 2,500 रु.; प्रिमीयम इकॉनॉमी : 4,000 ; दुचाकी वाहन : 1,000 रु.; सायकल : 600 रु.; चारचाकी : 6,000 रु. तसेच, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. पर्यटकांना कोकणाच्या सुंदर किनारपट्टीचा अनुभव घेण्यासाठी ही एक उत्तम संधी ठरेल.

यापूर्वी मुंबई ते कोकण अशी जलवाहतूक सुरू होती, पण एका दुर्दैवी जहाजाच्या अपघातानंतर ती बंद पडली होती. बंदर विकास खात्याची जबाबदारी नीतेश राणे यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडे या जलप्रवासी सेवेसाठी पाठपुरावा केला. जर या सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला, तर कोकणातील पर्यटन क्षेत्राला निश्चितच नव्याने चालना मिळेल. या सेवेमुळे प्रवाशांना आरामदायी आणि निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव घेता येईल. तसेच, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. पर्यटकांना कोकणाच्या सुंदर किनारपट्टीचा अनुभव घेण्यासाठी ही एक उत्तम संधी ठरेल.