सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांनी जात, पात, धर्मभेद केला नाही. त्यांनी सर्वांनी एकत्र घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. त्यांच्या विचारांने आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया अखिल भारतीय मराठा महासंघाचा हा भव्यदिव्य उपक्रम पुढे १०० वर्ष चालू राहील या दृष्टीने महासंघाने कार्य करावे, त्यासाठी आम्हा सर्वांचे सहकार्य राहील असा विश्वास मराठा समाजाचे नेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा शहरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर युवराज लखमराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, जि.प. सदस्य विक्रांत सावंत, नगरसेवक अजय गोंदावळे, निरज देसाई, विद्याधर परब, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत, पुंडलिक दळवी, दिगंबर नाईक, विशाल सावंत, मनोज घाटकर, संजय लाड आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर म्हणाले, सावंतवाडीतील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानची मोकळी जागा शहरातील विविध मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी विना मोबदला देण्यासाठी व्यवस्था लवकरच केली जाईल. त्यासाठीचा ठराव बैठकीत घेण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, मायकल डिसोजा, नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, उत्कर्षा गांवकर, प्रणाली टिळवे, मायकल डिसोजा, प्रथमेश सावंत, नगरसेवक अजय गोंदावळे, स्नेहा नाईक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जात, पात, धर्मभेद केला नाही. त्यांनी सर्वांनी एकत्र घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याची स्थापन केली. त्यांच्या विचारांने आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया अखिल भारतीय मराठा महासंघाचा हा भव्यदिव्य उपक्रम पुढे १०० वर्ष चालू राहील या दृष्टीने महासंघाने कार्य करावे, त्यासाठी आम्हा सर्वांचे सहकार्य राहील असा विश्वास मराठा समाजाचे नेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवजन्मोत्सव सोहळा शहरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर युवराज लखमराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, जि.प. सदस्य विक्रांत सावंत, नगरसेवक अजय गोंदावळे, निरज देसाई, विद्याधर परब, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत, पुंडलिक दळवी, दिगंबर नाईक, विशाल सावंत, मनोज घाटकर, संजय लाड आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर म्हणाले, सावंतवाडीतील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानची मोकळी जागा शहरातील विविध मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी विना मोबदला देण्यासाठी व्यवस्था लवकरच केली जाईल. त्यासाठीचा ठराव बैठकीत घेण्यात येईल असे सांगितले. याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, मायकल डिसोजा, नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, उत्कर्षा गांवकर, प्रणाली टिळवे, मायकल डिसोजा, प्रथमेश सावंत, नगरसेवक अजय गोंदावळे, स्नेहा नाईक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.