सावंतवाडीत अपक्षांचा 'किंग' कोण ?

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 09, 2026 16:53 PM
views 393  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शश सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्षांनी पक्षांच्या उमेदवारांची धुळधाण करून सोडली. जिल्हा परिषदेत ९ जागांपैकी ३ व पंचायत समितीत १८ पैकी तब्बल ५ अपक्ष मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यावेळीच्या निवडणूकीत अपक्षांच्या शक्तीसमोर पक्षांचे उमेदवार जेरीस आले होते. त्यात आता निकालात देखील अपक्षांचा बोलबाला दिसून आल्यानं अपक्षांच्या विजयाचा किंग कोण ? हा प्रश्न निरूत्तरीत राहीला आहे.पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मतदार संघात अपक्षांचा यावेळी बोलबाला दिसून आला. या परिस्थितीचे नेमके विश्लेषण काय ? यामागे अदृश्य शक्ती कोणती ? याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. अपक्षांसमोर महायुतीचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले असून महायुतीतील बंडखोरच अपक्ष म्हणून जिंकून आलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच निवडून आलेल्या या अपक्षांच्या मागे शक्ती कोणाची होती ? "किंगमेकर" कोण ? यांची चर्चा होत आहे.