
सावंतवाडी : माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेकरिता विद्यार्थीची बैठक व्यवस्था राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या केऺद्रावर करण्यात आली आहे. चालू वर्षी कॉपी मुक्त अभियान व सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी (चेकीग) केली जाईल त्यामुळे सर्व परीक्षार्थींनी परीक्षेपूर्वी किमान पाऊण तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे. सकाळच्या सत्रात 10.30 नंतर व दुपारच्या सत्रात 2.30 नंतर येणाऱ्या परीक्षार्थींना प्रवेश दिला जाणार नाही. राणी पार्वती देवी हायस्कूल व जुनियर कॉलेज या केंद्रावर बैठक व्यवस्था खालील प्रमाणे असेल विज्ञान शाखा W007130 to W007449,- वाणिज्य शाखा- W021471 to W021760, कला शाखा- -W013913 to W014108, टेक्निकल - W023902 to W400081 अशी करण्यात आली आहे या केद्रावर एकूण 820 विद्यार्थीची व्यवस्था केली आहे.परीक्षार्थींनी वेळेत उपस्थित राहावे व सहकार्य करावे असे आवाहन विद्यार्थी, पालक, आणि शिक्षक यांना केऺद्रप्रमुख डॉ. सुमेधा नाईक यांनी केले आहे.










