
सावंतवाडी : गुळदुवे जोशीवाडी - आडारकरवाडी जोडणारा लोखंडी साकव धोकादायक स्थितीत असून येथे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील ग्रामस्थांची या साकवावरून सतत ये जा असते. साकव हा पूर्णतः गंजून गेल्याने,या साकवावरून चालताना जीव मुठीत घेऊनच चालाव लागत. गुळदुवे ग्रामपंचायत नजीकच नदीवर हा लोखंडी साकव असून,हा लोखंडी साकव पूर्णतः गंजून गेला आहे तसेच या साकवावरील पत्रे गंजून ते कोसळण्याच्या स्थितीत आहेत.त्यामुळे या साकवावरून चालणे म्हणजे जिगरीचेच आहे.
हा साकव धोकादायक स्थितीत असल्याने गुळदूवे ग्रामपंचायत च्या वतीने येथे साकव धोकादायक असल्याचा बोर्ड लावून येथील ग्रामस्थांना सूचित करण्यात आले आहे. मात्र लवकरात लवकर या साकवाची दुरुस्ती करून ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.










