चर्चा तर होणारच ! ; भाजपच्या विनोद राऊळ यांनी लावला स्टेटस

Edited by: विनायाक गांवस
Published on: February 01, 2026 12:15 PM
views 234  views

सावंतवाडी : भाजपचे युवा नेते विनोद राऊळ यांचा 'भावी सभापती' हा व्हाट्सॲप स्टेटस चर्चेत आला असून भावी सावंतवाडी पंचायत समिती सभापती म्हणून शिवसेनेच्या सुस्मिता जाधव यांचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे तळवडे मतदारसंघाच्या चर्चेत आणखीनच भर पडली आहे. पंचायत समिती सभापती पद महिलांसाठी आरक्षित झाले असून ते अनुसूचित जातीसाठी राखीव झालं आहे. तळवडे पंचायत समिती मतदारसंघ यासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे येथून विजयी होणारा उमेदवार हा थेट सभापतीपदी विराजमान होणार आहे. यातच भाजपचे युवा नेते विनोद राऊळ यांनी ठेवलेला व्हाट्सॲप स्टेटस चर्चेत आला आहे. भावी सभापती सुस्मिता सुधाकर जाधव असा उल्लेख त्यांनी केला आहे. श्रीम. जाधव‌ या शिवसेनेकडून मैदानात असून दोन अपक्षांसह उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांच आव्हान त्यांच्या समोर आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे संदीप गावडे लढत असून या ठिकाणी महायुती आहे. इतर काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना युतीत मैत्रीपूर्ण लढत होत असली तरीही तळवडेत महायुती एकत्र आहे. त्यात राऊळ यांनी लावलेल्या या  स्टेटसमुळे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत महायुतीच पारडं जड मानलं जात आहे.