
सावंतवाडी : ऐतिहासिक मोती तलाव काठावरील पादचारी मार्ग खचलेला होता. यावरून चालणे देखील मुश्किल झाले होते. मॉर्निंग, इव्हीनींग, नाईक वॉकला येणाऱ्यांसह पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी घेत हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
नगराध्यक्षा सौ. भोंसले यांनी नागरिकांना होणारा त्रास बघता तात्काळ फुटपाथ दुरूस्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार हा खचलेला पादचारी मार्ग दुरूस्त करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. श्रीराम वाचन मंदिर समोरील भागापासून या कामाला सुरुवात केली आहे. संपूर्ण तलाव काठावरील हा पादचारी मार्ग दुरूस्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाच वातावरण निर्माण झाले आहे.










