बिबट्याच्या हल्ल्यातून मळेवाडचा युवक थोडक्यात बचावला

Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2026 16:10 PM
views 203  views

सावंतवाडी : मळेवाड नाईकवाडी येथील सतीश नाईक हा युवक आपल्या दुचाकीवरून निरवडे येथे कामानिमित्त गेला होता. मात्र काल गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना घोडेमुख पायथ्या नजीकच्या मुख्य रस्त्यावर  झडप घालण्याच्या तयारीत असलेला बिबट्या त्याच्या नजरेस पडला. मात्र कुत्रा असेल म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. परंतु मागे वळून  पाहिले तर त्याच्या मागून चक्क बिबटा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच त्याने गाडी जोरात पळवित मळेवाडला येत घडलेली घटना ग्रामस्थांना दिली. याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली. मात्र, घडलेल्या घटनेमुळे सतीश नाईक हा युवक भांबावलेला. सध्या सगळीकडे हे जंगली प्राणी भक्षाच्या शोधात मानवीवस्तीत येऊ लागले आहेत. पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत. वनखात्याने तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे.